नागपूर आणि विदर्भातील मंगळवारच्या ठळक घडामोडी | Sakal Media |

2021-04-28 2,203

महापालिकेच्या शिक्षकांना कोविडच्या कामात जुंपण्यात आले आहे. ऑनलाइन शाळा सांभाळून अनेक शिक्षक कोविड संदर्भात कामे करत आहेत. शिक्षकांना या कामातून मुक्तता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कोरोना संक्रमण झाल्यास शिक्षकांसह कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत बेड आरक्षित ठेवण्यात यावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.
कोविड संदर्भात कामे करणाऱ्या शिक्षकांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. ५५ वर्षांवरील आणि अस्थमा, मधुमेह, रक्तदाब यासह दिव्यांग, अपघातग्रस्त व विविध आजारांनी ग्रस्त शिक्षकांना या कामातून सरसकट मुक्त करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिक्षकांना बाहेरील काम न देता त्यांना झोनस्तरावर कार्यालयीन कामेच देण्यात यावी. याशिवाय ऑक्सिमीटरद्वारे तपासणीसाठी वैद्यकीय चमू नियुक्त करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात आले.

अनेक मोबाईलमध्ये जुने ५.१ व्हर्जन असल्याने त्यात विद्यापीठाच्या परीक्षेचे अ‌ॅप डाउनलोड होत नसल्याचा तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यापीठाने त्याची दखल घेत त्यात काही सुधारणा केल्या आहेत. आता ५.१ व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्ये 'आरटीएमएनयू परीक्षा अ‌ॅप' डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांमध्ये सुमारे ७० हजार विद्यार्थी आहेत. त्यासाठी जवळपास ४ लाख ७० हजार नागरिकांनी हे ‌अ‌ॅप डाउनलोड केले आहे. त्यामुळे संकेतस्थळ आणि सर्व्हरवर ताण पडतो. यामुळे विद्यार्थी अ‍ॅपचा वापर करताना बऱ्याच तक्रारी येत होत्या. यापैकी मुख्य तक्रार म्हणजे ५.१ व्हर्जन असलेल्या अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर हे अ‌ॅप डाउनलोड करता येत नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता हे app मोबाईलवरही वापरता येणार आहे.

अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 52 वा पुण्यतिथी महोत्सव येत्या 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज आश्रममध्ये होणार आहे. परंतु, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक महोत्सव, धार्मिक स्थळे यावर शासनाची बंदी कायम आहे

Free Traffic Exchange

Videos similaires